IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलिया कसोटीआधी पंतप्रधान मोदींचे कर्णधारांना खास गिफ्ट

भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून चौथा कसोटी सामना सुरु असून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लावली होती हजेरी
IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलिया कसोटीआधी पंतप्रधान मोदींचे कर्णधारांना खास गिफ्ट

आजपासून बॉर्डर गावस्कर चषकमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथा आणि निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात झाली. हा सामना अतिशय खास ठरला. कारण, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनीदेखील या सामन्याला हजेरी लावली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून दोन्ही पंतप्रधानांनी क्रिकेटपटूंची भेट घेतली.

विशेष म्हणजे, सामन्याआधी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या क्रिकेट संघाच्या कर्णधाराचा गौरव केला आणि विशिष्ट कसोटी सामन्यासाठी त्यांना खास कॅप देण्यात आली.

आजच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी एक खास नाणे बनवण्यात आले होते. यामध्ये दोन्ही देशांच्या ७५ वर्षांच्या क्रिकेट स्मृतींचे चित्रण करण्यात आले होते. नाणेफेकीनंतर रवी शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना भारतीय क्रिकेटशी संबंधित खास आठवणी सांगितल्या आणि त्यांचे फोटोही दाखवले. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींना एक विशेष आर्टवर्क भेट केले. ज्यामध्ये दोन्ही देशांमधील ७५ वर्षांच्या क्रिकेट संबंधांचे चित्रण करण्यात आलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in