वर्ल्डकप जिंकण्याचं गिफ्ट! भारतीय रेल्वेकडून प्रतिका रावळ, रेणुका ठाकूर आणि स्नेह राणाचं प्रमोशन; आता मिळाली 'ही' पोस्ट

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील विजयानंतर भारतीय रेल्वेने महिला क्रिकेटपटूंना मोठं गिफ्ट दिलं आहे. विश्वचषक २०२५ विजेत्या संघातील प्रतिका रावळ, रेणुका ठाकूर, आणि स्नेह राणा यांना भारतीय रेल्वेकडून क्रीडा विभागात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी, (OSD) म्हणजेच विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.
वर्ल्डकप जिंकण्याचं गिफ्ट! भारतीय रेल्वेकडून प्रतिका रावळ, रेणुका ठाकूर आणि स्नेह राणाचं प्रमोशन; आता मिळाली 'ही' पोस्ट
वर्ल्डकप जिंकण्याचं गिफ्ट! भारतीय रेल्वेकडून प्रतिका रावळ, रेणुका ठाकूर आणि स्नेह राणाचं प्रमोशन; आता मिळाली 'ही' पोस्टPhoto- X (@PIB_India)
Published on

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील विजयानंतर भारतीय रेल्वेने महिला क्रिकेटपटूंना मोठं गिफ्ट दिलं आहे. विश्वचषक २०२५ विजेत्या संघातील प्रतिका रावळ, रेणुका ठाकूर, आणि स्नेह राणा यांना भारतीय रेल्वेकडून क्रीडा विभागात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी, (OSD) म्हणजेच विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. या तिन्ही खेळाडूंना आता ग्रुप बी गॅझेटेड अधिकाऱ्यांच्या समान वेतन आणि सुविधा मिळणार आहेत. या खेळाडूंना, आउट ऑफ टर्न प्रमोशन  (Out of Turn Promotion) द्वारे पदोन्नती देण्यात आली आहे.

वर्ल्डकपमधील शानदार कामगिरीबद्दल क्रिकेटपटूंचा सन्मान

उत्तर रेल्वेची वरिष्ठ लिपिक प्रतिका रावळला २०२५ मधील प्रभावी कामगिरीबद्दल रेल्वे मंत्रालयाने विशेष बढती दिली आहे. उत्तर रेल्वे क्रीडा संघटनेने तिच्या पदोन्नतीसाठी मंत्रालयाकडे पत्र पाठवले होते, त्यानंतर मंत्रालयाने वेतन मॅट्रिक्स ७ वा सीपीसी लेव्हल ८ मध्ये ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी)’ या गट ‘ब’ पदावर तिच्या प्रमोशनला मान्यता दिली.

प्रतिका रावळने विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु, उपांत्य फेरीपूर्वी दुखापतीमुळे तिला स्पर्धेबाहेर जावे लागले होते. तिने सात सामन्यांपैकी सहा डावांत ७७.७८ च्या स्ट्राईक रेटने ३०८ धावा ठोकल्या.

दरम्यान, रेल्वे बोर्डाने रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणालाही ७ व्या सीपीसी वेतन मॅट्रिक्सच्या लेव्हल ८ मध्ये ‘विशेष कार्यकारी अधिकारी (क्रीडा)’ या गट ‘ब’ पदावर पदोन्नती दिली आहे. देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

विश्वचषक जिंकत रचला इतिहास

भारतीय महिला संघाने २ नोव्हेंबर २०२५ रोजी इतिहास रचत पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. यापूर्वी दोनदा अंतिम फेरी गाठूनही विजेतेपद हुकले होते. अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २९८ धावांचा डोंगर उभा केला आणि दक्षिण आफ्रिकेला २४६ धावांवर रोखत ऐतिहासिक विजय मिळवला. शेफाली वर्मा सामनावीर ठरली, तर संपूर्ण स्पर्धेत सर्वांगीण खेळासाठी दीप्ती शर्माला ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार मिळाला.

logo
marathi.freepressjournal.in