भारताचा टेबल टेनिसपटू शरथ कमलची निवृत्ती

भारताचा टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने बुधवारी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. शरथ २५ ते २० मार्च दरम्यान चेन्नईत रंगणाऱ्या वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत अखेरचा खेळणार आहे.
भारताचा टेबल टेनिसपटू शरथ कमलची निवृत्ती
एक्स @KirenRijiju
Published on

नवी दिल्ली : भारताचा टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने बुधवारी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. शरथ २५ ते २० मार्च दरम्यान चेन्नईत रंगणाऱ्या वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत अखेरचा खेळणार आहे.

४२ वर्षीय शरथला २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून नेमण्यात आले होते. मात्र त्याला पदक जिंकता आले नाही. तसेच ५ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये शरथने भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताचा सर्वाधिक अनुभवी टेबल टेनिसपटू म्हणून शरथची ओळख होती. मनिका बत्रा, साथियन यांच्यासह शरथने भारतासाठी संस्मरणीय विजय मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने पदकांची कमाई केली.

“माझ्या कारकीर्दीतील शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा मी चेन्नईत खेळणार आहे. माझ्या कारकीर्दीतील ही अखेरची लढत असेल. गेल्या २० ते २२ वर्षांचा काळ संस्मरणीय होता,’ असे शरथने म्हटले. तसेच टेबल टेनिसशी सातत्याने निगडीत राहीन, असेही तो म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in