टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ ९० ते ९५ टक्के तयार - रोहित शर्मा

ऑक्टोबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक क्रकेट स्पर्धा नियोजित आहे.
 टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ ९० ते ९५ टक्के तयार - रोहित शर्मा

भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ९० ते ९५ टक्के संघ तयार आहे; मात्र संघात काही किरकोळ बदल करायचे आहेत. भारतीय संघ जवळपास सज्ज झाला आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

ऑक्टोबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक क्रकेट स्पर्धा नियोजित आहे. टी-२० विश्वचषकाच्या संघाबद्दल रोहित म्हणाला की, या संघात आणखी काही खेळाडूंना संधी दिली जाईल. आशिया चषक सुपर-४ फेरीत श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही आणखी काही खेळाडूंना संधी देणार आहोत. त्यानंतर टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला जाईल. सध्या जो संघ आहे तो टी-२० विश्वचषकासाठी ९५ टक्के निश्चित आहे.

त्याने निर्दशनास आणून दिले की, आम्ही फक्त दोनच सामने गमावले आहेत. गेल्या विश्वचषकापासून आम्ही जास्त सामने जिंकत आलो आहोत. या सामन्यांपासून आम्हाला बरेच काही शिकविले आहे. आम्ही अजूनही काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in