विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; युजवेंद्र चहल आणि आर. आश्विनला स्थान नाही

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ;  युजवेंद्र चहल आणि आर. आश्विनला स्थान नाही

विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या १५ शिलेदारांच्या घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय टीम इंडियातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. युजवेंद्र चहल आणि आर. आश्विन यांना या अंतिम १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नाही. सुर्यकुमार यादवला मात्र यात संधी देण्यात आली आहे.

५ ऑक्टोंबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामना ऑस्ट्रेलिया विरोधात सुरुवात करणार आहे. चेन्नई येथे हा सामना रंगणार आहे. भारतीय संघात पाच फलंदाज असून दोन विकेटकिप, ४ अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), केएल राहुल(विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सुर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्हद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in