वन-डे मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना; धवनचा झोपलेला फोटो व्हायरल

मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. के. एल. राहुल झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे
वन-डे मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना; धवनचा झोपलेला फोटो व्हायरल

आशिया कप सुरू होण्यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची नियोजित वन-डे मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ शनिवारी मध्यरात्री झिम्बाब्वेला रवाना झाला.

मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. के. एल. राहुल झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने ट्विटरवर प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चहर यांच्यासह अनेक खेळाडूंचे फोटो पोस्ट करून टीम इंडिया रवाना झाल्याची माहिती दिली.

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ३१ जुलै रोजी १५ जणांचा संघ जाहीर केला, त्यावेळी संघाची धुरा शिखर धवनकडे सोपविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी के. एल. राहुलने तंदुरुस्ती चाचणी ओके केल्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली. या दौऱ्यावर आता धवन संघाचा उपकर्णधार असणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिखर धवनने त्याच्या फेसबुक स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला, त्यामध्ये तो विमानतळावर झोपलेला दिसत होता.

आशिया चषकापूर्वी नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडला विश्रांती दिल्यानंतर बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेला पाठविले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in