भारताचा टेनिस संघ पाकिस्तानात दाखल; तब्बल ६० वर्षांनी उभय संघांत रंगणार डेव्हिस चषक लढत

पाकिस्तान टेनिस महासंघाने भारतीय संघाचे इस्लामाबाद विमानतळावरील छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात आली होती.
भारताचा टेनिस संघ पाकिस्तानात दाखल; तब्बल ६० वर्षांनी उभय संघांत रंगणार डेव्हिस चषक लढत

इस्लामाबाद : भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी तब्बल ६० वर्षांनी पाकिस्तानात दाखल झाला आहे. पाकिस्तान टेनिस महासंघाने भारतीय संघाचे इस्लामाबाद विमानतळावरील छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात आली होती.

भारत-पाकिस्तान यांच्यात ३ व ४ फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद येथील कोर्टवर डेव्हिस चषकाची लढत होणार आहे. भारताच्या संघात रामकुमार रामनाथन, एन. श्रीराम बालाजी, युकी भांब्री, निकी पूनाचा, साकेत मायनेनी यांचा समावेश आहे. दिग्विजय प्रताप सिंग राखीव खेळाडू म्हणून संघाचा भाग आहे. झीशान अली भारताचे न खेळणारे कर्णधार तसेच प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावतील.

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागल या स्पर्धेत खेळणार नाही, तर रोहन बोपण्णाने मागेच डेव्हिस चषकातून निवृत्ती पत्करली.

हे नक्की वाचा!

भारतीय संघ टेनिस कोर्टवर जाण्यापूर्वी दररोज सकाळी एक बॉम्ब निकामी पथक केंद्राची पाहणी करतील.

या केंद्राचे निर्जंतुकीकरणसुद्धा करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांना पुर‌वण्यात येणारी सुरक्षा भारतीय संघाला देण्यात येईल.

भारतीय खेळाडूंच्या प्रवासादरम्यान दोन सुरक्षावाहने सतत त्यांच्या भोवती असतील.

१९६४मध्ये भारतीय संघ अखेरचा पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी भारताने ४-० असे वर्चस्व गाजवले होते. २०१९मध्येही भारताला पाकिस्तानात जायचे होते. मात्र त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव ही लढत कझाकस्तान येथे खेळवण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in