Mithali Raj
Mithali Raj

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

संघाची धुरा सांभाळण्यासाठी अनेक युवा खेळाडू तयार आहेत. भारतीय क्रिकेटचे भविष्य सोनेरी आहे
Published on

भारताच्या महिला वनडे (Indian Women Cricket) आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राजने (Mitali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तिने एक निवेदन सादर करून चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. मितालीने लिहिले की, “गेल्या अनेक वर्षांच्या प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद... माझ्या दुसऱ्या डावासाठी मला तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा हवा आहे.”

मितालीने पुढे लिहिले की, “प्रत्येक प्रवासाप्रमाणेच माझी क्रिकेट कारकीर्दही एका टप्प्यावर संपुष्टात यावी लागली. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून निवृत्ती घेत आहे. मी नेहमीच भारतीय संघाला विजय मिळवून देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आणि सर्वतोपरी प्रयत्न केले. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मला नेहमीच लक्षात राहील. संघाची धुरा सांभाळण्यासाठी अनेक युवा खेळाडू तयार आहेत. भारतीय क्रिकेटचे भविष्य सोनेरी आहे.

logo
marathi.freepressjournal.in