भारतीय महिलांनी लॉन बॉल्समध्ये इतिहास घडवला; सुवर्णपदक जिंकणारा भारत पहिला देश

भारतीय लॉन बॉल संघाने भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या चारवर पोहोचविली
भारतीय महिलांनी लॉन बॉल्समध्ये इतिहास घडवला; सुवर्णपदक जिंकणारा भारत पहिला देश
Published on

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी मंगळवारी भारताने पाचवे सुवर्णपदक जिंकत जणू ‘सुवर्णपंचक’च वसूल केला. भारतीय महिलांनी लॉन बॉल्समध्ये इतिहास घडविला. लॉन बॉल्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारत पहिला देश ठरला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर भारतीय महिलांनी १७-१०ने विजय मिळवित सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर भारतीय टेबलटेनिस पुरुष संघाने सिंगापूरचा ३-१ असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.

लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सौकिया आणि कर्णधार रूपा राणी तिर्की यांचा समावेश असलेल्या भारतीय लॉन बॉल संघाने भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या चारवर पोहोचविली. एकूण पदकांची संख्या दुहेरी आकड्यांची अर्थात १० झाली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी सुरुवातीला २-२ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर भारतीय संघाने ४-२ अशी आघाडी घेतली. आठव्या एंडनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेवर ८-४ अशी आघाडी मिळविली. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी मुसंडी मारली. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धची २-८ पिछाडी भरून काढत दहाव्या एंडपर्यंत सामना ८-८ असा बरोबरीत आणला. अकराव्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेने भारतावर १०-८ अशी आघाडी घेतली. त्यानंतर बाराव्या एंडनंतर भारताने ही पिछाडी भरून काढत सामना १०-१० असा बरोबरीत आणला.

भारताने तेराव्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेवर १२-१० अशी आघाडी मिळविली. त्यानंतर १४व्या एंडनंतर भारताने ही आघाडी १५-१० अशी वाढविली. यानंतर पंधराव्या आणि शेवटच्या एंडमध्ये भारतीय संघाने आपली आघाडी आणखी दोन गुणांनी वाढवित सुवर्णपदकावर कब्जा केला.

logo
marathi.freepressjournal.in