राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यानंतर चेन्नईमध्ये सुरू असलेल्या ४० व्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारताने शानदार कामगिरी करीत महिला आणि पुरुष दोन्ही गटात कांस्यपदक पटकाविले. ऑलिम्पियाडमध्येही ‘इंडिया शायनिंग’चे प्रतिबिंब उमटले. भारताने महिला गटात पहिल्यांदा कांस्यपदक पटकावले. भारतीय महिला अ संघाने ही कामगिरी केली.
खुल्या गटात भारताच्या पुरुष ब संघाने अंतिम फेरीत जर्मनीचा ३-१ ने पराभव करत कांस्यपदक मिळविले. खुल्या संघात प्रज्ञानानंदना, गुकेश, निहाल, रौनक आणि अधिबान यांचा समावेश होता. भारतीय ब संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
उझबेकिस्तानने नेदरलँडला २-१ असे पराभूत करत सुवर्णपदक पटकाविले. बुद्धिबळात दबदबा निर्माण करणाऱ्या अमेरिकेने खुल्या गटातील अंतिम फेरीत स्पेनवर ५-२, ५-१ असा पराभव केला.
भारताच्या अव्वल मानांकित महिला अ संघाला अकराव्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे सुवर्णपदक हुकले. अंतिम फेरीत कोनेरू हम्पीच्या नेतृत्वातील भारतीय महिला अ संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.