हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर,कर्णधार राणी रामपाल संघाबाहेर

महिला हॉकी विश्वचषक १ ते १७ जुलै दरम्यान नेदरलँड आणि स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार
हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर,कर्णधार राणी रामपाल संघाबाहेर

महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला. मात्र, भारताला टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत नेणारी कर्णधार राणी रामपालला यावेळी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाकडे नेतृत्त्वाची धुरा सोपविण्यात आली असून दीप ग्रेस एक्काला उपकर्णधार करण्यात आले आहे. महिला हॉकी विश्वचषक १ ते १७ जुलै दरम्यान नेदरलँड आणि स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. दरम्यान, राणी रामपाल दुखापतीतून सावरत आहे.

स्ट्रायकर आणि माजी कर्णधार राणी रामपाल पायाच्या स्नायूंच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बेल्जियम आणि नेदरलँड्सविरुद्धच्या एफआयएच प्रो लीग सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. संघाचा भाग असूनही राणी प्रो लीगच्या युरोपियन लेग दरम्यान पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळली नव्हती. यामुळे ती अनफिट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र हॉकी इंडियाने तिच्या फिटनेसची स्थिती स्पष्ट केलेली नाही. राणीला स्थान न मिळाले नसले, तरी संघात दुसरे पर्यायी नाव नाही. बचावपटू इशिका चौधरी आणि अक्षता आबासो ढाकले, मिडफिल्डर बलजीत कौर आणि स्ट्रायकर संगीता कुमारी यांनाही वगळण्यात आले आहे. या खेळाडू नुकत्याच झालेल्या एफआयएच प्रो लीग सामन्यांमध्ये भारतीय संघाचा भाग होत्या. भारताचा ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड आणि चीनसोबत समावेश आहे. संघ ३ जुलै रोजी आपला पहिला सामना इंग्लंड विरुद्ध खेळेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध कांस्यपदकाची लढत गमावली. दरम्यान, लंडनमध्ये झालेल्या गेल्या विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडविरुद्ध शूटआऊटमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताचे प्रशिक्षक यानेक शॉपमन म्हणाले की, विश्वचषकासाठी आम्हाला सर्वोत्तम संघ मिळाला आहे. हे अनुभवी आणि तरुण प्रतिभेचे मिश्रण आहे ज्यांनी एफआयएच प्रो लीगमधील अव्वल संघाविरुद्ध संधी मिळाल्यावर चमकदार कामगिरी केली आहे. राणीच्या दुखापतीबद्दल प्रशिक्षक म्हणाले की, दुखापतीतून पूर्ण सावरण्यात अपयशी ठरलेल्या राणीशिवाय टोकियो ऑलिम्पिक मोहिमेचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. ज्योती आणि सोनिका यांनाही संघात स्थान मिळाले आहे. त्यांनी संधी मिळाली, तेव्हा शानदार कामगिरी केली आहे. ब गटातील सामने स्पेनमध्ये खेळविले जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in