टी-२० सामन्यात भारतीय महिला संघ आघाडीवर, जेमिमामुळे विजय शक्य

कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली
टी-२० सामन्यात भारतीय महिला संघ आघाडीवर, जेमिमामुळे विजय शक्य

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (२७ चेंडूंत नाबाद ३६ धावा) दडपणाखाली साकारलेली दमदार खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने गुरुवारी पहिल्या टी-२० लढतीत श्रीलंकेवर ३४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

दाम्बुला येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकांत ५ बाद १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु डावखुरा फिरकीपटू राधा यादव (२/२२) आणि अन्य गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी, स्मृती मानधना (१), शाबिनी मेघना (०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२२) यांनी निराशा केल्यावर शफाली वर्मा (३१) आणि जेमिमा यांच्या योगदानामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. दीप्ती शर्मानेसुद्धा ८ चेंडूंत १७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in