बोपण्णा-एब्डेन जोडी अजिंक्य; क्रमवारीत पुन्हा अग्रस्थानी झेप; वर्षातील दुसऱ्या जेतेपदाला गवसणी

बोपण्णा-एब्डेन यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बोपण्णा व एब्डेन यांनी क्रोएशियाचा एव्हान दोडिग आणि अमेरिकन ऑस्टिन क्रॅजिक यांना ६-७ (३-७), ६-३, १०-६ असे तीन सेटमध्ये पराभूत केले.
बोपण्णा-एब्डेन जोडी अजिंक्य; क्रमवारीत पुन्हा अग्रस्थानी झेप; वर्षातील दुसऱ्या जेतेपदाला गवसणी

मियामी : भारताचा ४३ वर्षीय रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डेन यांनी रविवारी मियामी ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्याशिवाय ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वाधिक वयस्कर टेनिसपटू ठरला. बोपण्णा-एब्डेन जोडीचे हे वर्षातील दुसरे जेतेपद ठरले. यासह बोपण्णाने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा अग्रस्थान मिळवले.

बोपण्णा-एब्डेन यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बोपण्णा व एब्डेन यांनी क्रोएशियाचा एव्हान दोडिग आणि अमेरिकन ऑस्टिन क्रॅजिक यांना ६-७ (३-७), ६-३, १०-६ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. त्यांनी २ तास, १० मिनिटांच्या संघर्षानंतर ही लढत जिंकली. या विजयामुळे बोपण्णाला जुलै व ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्याला थेट पात्रता मिळण्याची दाट शक्यता आहे. बोपण्णा व एब्डेन यांनी जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते.

“मोठ्या स्पर्धांमध्ये जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता, तेव्हा लाभणारे सुख निराळे असते. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील कामगिरी येथेही करता आल्याने मी आनंदी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संधी मिळाल्यास मी नक्कीच देशासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करेन,” असे बोपण्णा म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in