पुरुषांच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात

हरमीत देसाईला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या फॅन झेन्डोंगने ११-२, ११-९, ११-५ असे सहज पराभूत केले
पुरुषांच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक प्रकारातील भारताचे आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. गुरुवारीन चीनने उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुषांवर सरशी साधली. बुधवारी भारताच्या महिला संघालासुद्धा चायनीज तैपईकडून पराभव पत्करावा लागला होता. गुरुवारी पुरुषांच्या विभागात चीनने भारताला ३-० असे सहज नमवले. हरमीत देसाईला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या फॅन झेन्डोंगने ११-२, ११-९, ११-५ असे सहज पराभूत केले. अनुभवी जी. साथियनवर मा लाँगने १४-१२, ११-५, ११-० असा विजय मिळवला. त्यानंतर वँग चीकीनने मनुष शहावर ११-४, ११-५, ११-६ असे प्रभुत्व गाजवून भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. महिलांमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला, दिया चितळे या तिघींनी एकेरीचे सामने गमावले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in