भारताच्या अंतिम पांघलने जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अंतिमचे अभिनंदन केले आहे.
भारताच्या अंतिम पांघलने जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक

भारताच्या अवघ्या १७ वर्षांच्या अंतिम पांघलने २० वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. ती २० वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. याचबरोबर भारताने २० वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सात पदके मिळवत सांघिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अंतिमचे अभिनंदन केले आहे. तिच्यावर सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अंतिम पांघलने ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्यात कझाकिस्तानच्या अल्तयन शाकायेव्हाचा ८-० असा सहज पराभव केला. अंतिमने याच वर्षी आशिया ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतसुद्धा सुवर्णपदकाची कमाई केली होती.

सांघिक क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर

अंतिमसोबत आणखी सहा कुस्तीपटूंनी देखील पदकाची कमाई करत भारताला सांघिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचविले. ७६ किलो वजनी गटात प्रिया मलिकने रौप्य, ६२ किलो वजनी गटात सोनम मलिकने रौप्य, ६५ किलो वजनी गटात प्रियांकाने रौप्य, ५७ किलो वजनी गटात सितोने कांस्य, ७२ किलो वजनी गटात रितिकाने कांस्य तर ५० किलो वजनी गटात प्रियांशीने देखील कांस्यपदक जिंकले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in