
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ट्रिपल जम्प प्रकारात भारताचा एल्डहोसे पॉल अंतिम फेरीत नवव्या स्थानावर राहिला. त्याला फायनलच्या टॉप आठमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले. त्याने १६.७९ मीटर लांब उडी मारली. पॉल हा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ट्रिपल जम्प प्रकारात फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ही १६.९९ मीटर इतकी आहे.
एल्डहोसे पॉल पहिल्या दोन प्रयत्नात १६.३७ मीटर उडी मारत पदकाच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर त्याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारत १६.७९ मीटर उडी मारली. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने १३.८६ मीटर उडी मारली.
पॉल पहिल्या तीन उडींच्या आधारे पहिल्या आठ जणांच्या यादीत येण्यापासून थोडक्यात चुकला. तो १९.७९ मीटर उडीच्या आधारे यादीत नवव्या स्थानावर राहिला.