लॉन बॉल स्पर्धेमध्ये भारताचे पदक निश्चित;न्यूझीलंडचा केला पराभव

भारताने अंतिम फेरीतील स्थान निश्चित करताना सुरुवातीची १-६ अशी पिछाडी भरून काढत जोरदार मुसंडी मारली
लॉन बॉल स्पर्धेमध्ये भारताचे पदक निश्चित;न्यूझीलंडचा केला पराभव

भारतीय महिला संघाने लॉन बॉलमध्ये उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून एक पदक निश्चित केले. भारताने न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव केला. भारताने अंतिम फेरीतील स्थान निश्चित करताना सुरुवातीची १-६ अशी पिछाडी भरून काढत जोरदार मुसंडी मारली.

भारताचे लॉन बॉलमध्ये मिमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. आता अंतिम सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारी होणार आहे. हा सामना दुपारी ४.१५ वाजता सुरू होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव केला. याचबरोबर भारतीय संघाने पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉलमध्ये अंतिम फेरी गाठून इतिहास रचला. भारतीय महिला संघाने विजय मिळवला, तर भारताला सुवर्णपदक मिळेल. लॉन बॉल भारतीय संघात रूपाराणी तिर्की, नयनमोनी सैकिया, लवली चौबे आणि पिंकी सिंग यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in