T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने आज (दि.30) टीम इंडियाची घोषणा केली.
T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये
Published on

आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने आज (दि.३०) टीम इंडियाची घोषणा केली. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत २ ते २९ जून दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी रोहित शर्मा हाच भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर, हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल.

विश्वचषकाच्या संघामध्ये रिषभ पंत याचे पुनरागमन झाले आहे. कार अपघातानंतर रिषभचे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय, आयपीएल २०२४ मध्ये सीएसकेकडून धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेलाही संधी मिळाली आहे. तर, रोहीतसोबत सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालची निवड करण्यात आली असून शुबमन गिल राखीव खेळाडू आहे. याशिवाय संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांचीही वर्णी लागली आहे.

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार)

यशस्वी जैस्वाल

विराट कोहली

सुर्यकुमार यादव

रिषभ पंत (यष्टीरक्षक)

संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

हार्दिक पांड्या (उपकर्णधार)

शिवम दुबे

रविंद्र जडेजा

अक्सर पटेल

कुलदीप यादव

युजवेंद्र चहल

अर्शदीप सिंग

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू -

शुबमन गील

रिंकू सिंग

खलील अहमद

आवेश खान

logo
marathi.freepressjournal.in