अव्वल २० खेळाडूंमध्ये भारताची वाणी कपूरने पटकावले स्थान

अन्य भारतीयांमध्ये अमनदीप द्राल (६७) संयुक्तरीत्या २६ व्या स्थानी आणि दीक्षा डागर (७२) संयुक्तरीत्या ५९ व्या स्थानावर राहिले
अव्वल २० खेळाडूंमध्ये भारताची वाणी कपूरने पटकावले स्थान

भारताची गोल्फर वाणी कपूरने लेडीज यूरोपीय टूर टूर्नामेंट डिड्रिकसन्स स्काफ्टो ओपनमध्ये संयुक्तरीत्या १९वे स्थान पटकाविले.

नेदरलॅन्डमध्ये गेल्या टूर्नामेंटमध्ये संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या वाणीने एकूण दोन अंडर-२०५ स्कोअर करत अव्वल २० खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. लय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या त्वेसा मलिकने लागोपाठ दुसऱ्यांदा पार ६९चे कार्ड खेळून एकूण दोन ओव्हर-२०९ स्कोअरसह संयुक्तरीत्या ३८व्या स्थानावर राहिली. अन्य भारतीयांमध्ये अमनदीप द्राल (६७) संयुक्तरीत्या २६ व्या स्थानी आणि दीक्षा डागर (७२) संयुक्तरीत्या ५९ व्या स्थानावर राहिले. भारतीय महिला गोल्फर आता फिनलँडमध्ये अलँड हंड्रेड लेडिज ओपनमध्ये सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in