मीराबाई ऑलिम्पिकसाठी पात्र

२०२४मध्ये तिला ऑलिम्पिक पात्रतेच्या उद्देशाने खेळाकडे वळणे गरजेचे होते. सोमवारी मीराबाईने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात ब-विभागात एकूण १८४ किलो वजन उचलले.
मीराबाई ऑलिम्पिकसाठी पात्र

फुकेत (थायलंड) : भारताची वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूला सोमवारी विश्वचषक वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. मात्र तरीही तिने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली.

२०२१मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये २९ वर्षीय मीराबाईने पहिल्याच दिवशी रौप्यकमाई केली होती. त्यानंतर २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यानंतर दुखापतीमुळे मीराबाई २०२३मध्ये असंख्य स्पर्धांना मुकली. मात्र २०२४मध्ये तिला ऑलिम्पिक पात्रतेच्या उद्देशाने खेळाकडे वळणे गरजेचे होते. सोमवारी मीराबाईने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात ब-विभागात एकूण १८४ किलो वजन उचलले. तिने स्नॅचमध्ये ८१ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात १०३ किलो वजन उचलून तिसरे स्थान मिळवले. २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होईल. मीराबाईच्या कारकीर्दीतील ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा असेल.

logo
marathi.freepressjournal.in