बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय;उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित

भारताने याआधी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुध्द ५-० ने विजय मिळविला होता.
बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय;उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन खेळात भारताने अ गटातील सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४-१ ने विजय मिळविला. गटात भारताने अव्वल स्थान पटकाविले. त्यामुळे भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आता निश्चित झाला आहे.

विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता किदांबी श्रीकांतने ऑस्ट्रेलियाच्या के लिन जियांग यिंग याला २१-१४, २१-१३ ने नमवून भारताला शानदार सुरुवात करून दिली. दोन वेळची ऑलिम्पिक विजेती पी. व्ही. सिंधूने ऑस्ट्रेलियाच्या वेंडी चेन हिला २१-१०, २१-१२ ने नमवून विजयी सातत्य टिकवून ठेवले. भारताने याआधी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुध्द ५-० ने विजय मिळविला होता. त्यांनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ ने नमवून गटात अव्वल स्थान पटकाविले. पुरूष दुहेरीत सुमित रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने ट्रॅन होआंग फाम आणि जॅक यू या ऑस्ट्रेलियाच्या जोडीला २१-१६, २१-१९ ने नमवित भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

महिला दुहेरीत मात्र भारताला पराभव पत्करावा लागला. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीला हसुआ यू वेंडी चेन आणि ग्रोन्या सॉमरविल्ले या जोडीकडून १३-२१, १९-२१ अशी मात खावी लागली. मिश्र दुहेरीत बी. सुमित रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीने यिंग झियांग लिन आणि ग्रोन्या सॉमरविल्ले यांना २१-१४, २१-११ ने नमवून भारताचा विजय ४-१ असा पक्का केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in