गिलचे अग्रस्थान कायम; भारतीय खेळाडूंचा सरावास प्रारंभ

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे.
गिलचे अग्रस्थान कायम; भारतीय खेळाडूंचा सरावास प्रारंभ
Published on

दुबई : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत गिल ८१७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ७७० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर भारताचा रोहित शर्मा व आफ्रिकेचा हेनरिच क्लासेन यांचा क्रमांक आहे. विराट कोहलीने एका स्थानाने आगेकूच करताना पाचवे स्थान मिळवले.

दरम्यान, भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल दुबईत परतला आहे. वैयक्तिक कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी मॉर्केल दक्षिण आफ्रिकेला गेला होता. तसेच बुधवारपासून भारतीय खेळाडूंनी सरावाच पुन्हा प्रारंभ केला. रविवार, २ मार्च रोजी भारत-न्यूझीलंड लढत रंगणार आहे. भारत व न्यूझीलंड या दोघांनीही उपांत्य फेरी गाठली आहे.

logo
marathi.freepressjournal.in