इनडोअर क्रिकेट स्पर्धा; महिला के. व्ही. क्लब अजिंक्य
PM

इनडोअर क्रिकेट स्पर्धा; महिला के. व्ही. क्लब अजिंक्य

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात के. व्ही. क्लबने एम. पी. शहा क्लबचा ५० धावांनी पराभव करून विजेतेपद मिळवले
Published on

मुंबई : महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे महिलांच्या इनडोअर क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात के. व्ही. क्लबने एम. पी. शहा क्लबचा ५० धावांनी पराभव करून विजेतेपद मिळवले.

अर्बन स्पोर्ट्स टर्फ, पार्क क्लब, केळुस्कर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ, दादर येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना के. व्ही. क्लबने १६ षटकांत ११९ धावा केल्या. सुनंदा (२५), आर. शेजल (३८), बी. परेरा (३३) यांनी दमदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरात एम. पी. शहा क्लब १६ षटकांत ६९ धावाच करू शकला. त्यांच्याकडून पिंकी (१६) व उर्वशी (१६) यांनी थोडाफार प्रतिकार केला.

logo
marathi.freepressjournal.in