जायबंदी राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार? सरावापासून दूरच

भारताचा अनुभवी फलंदाज के. एल. राहुल मांडीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता बळावली आहे.
जायबंदी राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार? सरावापासून दूरच

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज के. एल. राहुल मांडीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता बळावली आहे. राहुलने अद्याप सरावाला प्रारंभ केला नसून त्याच्या उजव्या माडींची सूज अद्याप कमी झालेली नाही.

३१ वर्षीय राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या कसोटीत खेळला होता. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे तो तीन सामन्यांना मुकला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली असून अखेरची कसोटी ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवण्यात येईल. राहुल आता लंडन येथे उपचारासाठी जाणार असल्याचे समजते. आशिया चषकापूर्वीसुद्धा राहुलला याच दुखापतीने ग्रासले होते.

दरम्यान, राहुलच्या जागी संधी मिळालेल्या रजत पाटिदारने आतापर्यंत तीन सामन्यांत निराशा केली. त्याने फक्त ६३ धावा केल्या आहेत. त्यामुळे डावखुऱ्या देवदत्त पडिक्कलला पाचव्या कसोटीसाठी संधी मिळू शकते. तसेच आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाचव्या सामन्यासाठी संघात परतेल, असे अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in