भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेच्या संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे फटका बसण्याची शक्यता

३४ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज रेगीस चकाब्वा याच्याकडे झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेच्या संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे फटका बसण्याची शक्यता

भारताविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेच्या संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. वेलिंग्टन मासाकादझा, ब्लेसिंग मुझराबानी, तेदांई चतारा हे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाहीत. क्रेग इरविन हा त्यांचा नियमित कर्णधार दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे ३४ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज रेगीस चकाब्वा याच्याकडे झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. चकाब्वाने याआधी २००८मध्ये पहिल्यांदाच झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले होते.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत चकाब्वा याच्याकडे पहिल्यांदाच नेतृत्व सोपविण्यात आले होते. ही मालिका झिम्बाब्वेने २-१ अशी जिंकली. भारत-झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय लढती १८, २० व २२ ऑगस्ट या कालावधीत खेळविण्यात येणार आहेत. या तिन्ही लढती हरारे येथे होणार आहेत. उभयदेशांमधील ही मालिका एकदिवसीय जागतिक स्पर्धा सुपर लीग या अंतर्गत खेळविण्यात येणार आहे. भारतानेही संघ जाहीर केलेला असून के एल राहुल नेतृत्व करणार आहे.

झिम्बाब्वेचा संघ : रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट किया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टिरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदिवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायूची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.

भारताचा संघ : के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in