आंतरशालेय थ्रोबॉल स्पर्धा;वसंत विहार शाळा पदार्पणातच विजयी

माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत कर्णधार स्वयंश ब्राम्हणेच्या नेतृत्वाखाली खेळताना वसंत विहार शाळेने पहिला डाव गमावला
आंतरशालेय थ्रोबॉल स्पर्धा;वसंत विहार शाळा पदार्पणातच विजयी
PM

मुंबई : ठाण्याच्या वसंत विहार शाळेने आंतरराज्य थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेत १२ वर्षांखालील गटाचे विजेतेपद मिळवले. स्पर्धेत प्रथमच सहभागी होत त्यांनी हे यश साध्य केले. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेत अंतिम फेरीत वसंत विहारने गोकुळधाम शाळेचा १८-२१, २१-१६, २१-१६ असा पिछाडीवरून पराभव केला.

माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत कर्णधार स्वयंश ब्राम्हणेच्या नेतृत्वाखाली खेळताना वसंत विहार शाळेने पहिला डाव गमावला. मात्र त्यानंतर सुरेखरित्या पुनरागमन करून अखेरचे दोन डाव जिंकत गोकुळधामचे स्वप्न उद्ध्वस्त केले. “वसंत विहार शाळेच्या खेळाडूंनी याआधीच्या विविध गटांत विजय संपादन केला आहे, मात्र १२ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे, असे प्रशिक्षक दीपक कोटियन म्हणाले. मुलींच्या संघाच्या प्रशिक्षिका पूजा दहिवलकर, शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन गावडे आणि प्राचार्य गीता नायर यांनी पहिल्याच स्पर्धेत जेतेपद पटकावल्यामुळे खेळाडूंचे अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in