तेंडुलकरांच्या अर्जुनने केले आयपीएलमध्ये पदार्पण; केकेआरविरोधात मैदानात

तेंडुलकरांच्या अर्जुनने केले आयपीएलमध्ये पदार्पण; केकेआरविरोधात मैदानात

आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्सच्या सामन्यांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पदार्पण करत आहे
Published on

आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएल २०२३चा २२वा सामना खेळवला जात आहे. यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आजच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले. तर, या सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो अर्जुन तेंडुलकर. कारण, बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर आजच्या सामन्यात त्याला संधी देण्यात येत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा आयपीएलमध्ये पदार्पण करत असून पहिला सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवर त्याच्या पदार्पणासाठी एक खास पोस्ट केली आहे. अर्जुन तेंडुलकर हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनाचे संघात स्वागत केले.

logo
marathi.freepressjournal.in