व्यंकटेश अय्यरची शतकी खेळी अपयशी; मुंबईचा केकेआरवर ५ विकेट्सनी विजय

आयपीएल २०२३च्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी सहज विजय मिळवून दिला
व्यंकटेश अय्यरची शतकी खेळी अपयशी; मुंबईचा केकेआरवर ५ विकेट्सनी विजय

आज वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने केकेआरवर ५ विकेट्सने विजय मिळवला. यावेळी केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज फलंदाजी करत शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर केकेआरने २० षटकात १८५ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, मुंबईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची चांगलीच चर्चा झाली. त्याने २ षटकांमध्ये १७ धावा दिल्या.

मुंबईने केकेआरच्या १८६ धावांचा पाठलाग करताना सांघिक खेळी केली. यावेळी ईशान किशन आणि रोहित शर्माच्या जोडीने ६५ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. रोहित २० धावांवर बाद झाला. मात्र, ईशानने ५८ धावा करत पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली. यानंतर आलेल्या सूर्यकुमारनेही २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. त्याला टिळक वर्माने ३० धावा करत चांगली साथ दिली. त्यानंतर टीम डेव्हिडनेही नाबाद २४ धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३मधील दुसरा विजय मिळवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in