गुजरातच्या गोलंदाजांचा लखनऊवर अंकुश

घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना लखनऊने क्विंटन डीकॉक (६) व देवदत्त पडिक्कल (७) यांना तीन षटकांतच गमावले. मात्र कर्णधार के. एल. राहुल (३१ चेंडूंत ३३) व मार्कस स्टोइनिस (४३ चेंडूंत ५८) यांनी लखनऊला सावरले.
गुजरातच्या गोलंदाजांचा लखनऊवर अंकुश

लखनऊ : उमेश यादव (२२ धावांत २ बळी) आणि दर्शन नळकांडे (२१ धावांत २ बळी) या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे गुजराट टायटन्सने आयपीएलमध्ये रविवारी लखनऊ सुपर जायंट्सला २० षटकांत ५ बाद १६३ धावांत रोखले.

घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना लखनऊने क्विंटन डीकॉक (६) व देवदत्त पडिक्कल (७) यांना तीन षटकांतच गमावले. मात्र कर्णधार के. एल. राहुल (३१ चेंडूंत ३३) व मार्कस स्टोइनिस (४३ चेंडूंत ५८) यांनी लखनऊला सावरले. स्टोइनिसने ४ चौकार व २ षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. हे दोघे बाद झाल्यावर निकोलस पूरनने २२ चेंडूंतच ३ षटकारांसह नाबाद ३२ धावा फटकावल्या. त्यामुळे लखनऊने किमान दीडशे धावांचा पल्ला गाठला. गुजरातकडून उमेश, नळकांडेने दोन, रशिद खानने एक बळी मिळवला.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती

  • राजस्थान - ४ - ४ - ० - ८ - १.१२०

  • कोलकाता - ३ - ३ - ० - ६ - २.५१८

  • चेन्नई - ४ - २ - २ - ४ - ०.५१७

  • लखनऊ - ३ - २ - १ - ४ - ०.४८३

  • हैदराबाद - ४ - २ - २ - ४ - ०.४०९

  • पंजाब - ४ - २ - २ - ४ - -०.२२०

  • गुजरात - ४ - २ - २ - ४ - -०.५८०

  • मुंबई - ४ - १ - ३ - २ - -०.७०४

  • बंगळुरू - ५ - १ - ४ - २ - -०.८४३

  • दिल्ली - ५ - १ - ४ - २ - -१.३७०

(मुंबई वि. दिल्ली सामन्यापर्यंत)

logo
marathi.freepressjournal.in