गिलचे हंगामातील पहिले अर्धशतक

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना वृद्धिमान साहा (११), केन विल्यम्सन (२६) स्वस्तात बाद झाले. मात्र गिलने ६ चौकार व ४ षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले.
गिलचे हंगामातील पहिले अर्धशतक
Published on

अहमदाबाद : कर्णधार शुभमन गिलने ४८ चेंडूंत साकारलेल्या नाबाद ८९ धावांच्या खेळीमुळे गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्ध २० षटकांत ४ बाद १९९ धावांपर्यंत मजल मारली.

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना वृद्धिमान साहा (११), केन विल्यम्सन (२६) स्वस्तात बाद झाले. मात्र गिलने ६ चौकार व ४ षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. त्याला साई सुदर्शन (३३) आणि राहुल तेवतिया (नाबाद २३) यांनी उत्तम साथ दिली. त्यामुळे गुजरातने दोनशे धावांचे लक्ष्य पंजाबसमोर ठेवले.

पहिल्या १० सामन्यांना विक्रमी प्रतिसाद

आयपीएलच्या १७व्या हंगामातील पहिल्या १० सामन्यांना चाहत्यांकडून विक्रमी प्रतिसाद लाभला. यंदाच्या १० सामन्यांत ३५ कोटींहून अधिक चाहत्यांनी टीव्ही अथवा मोबाईलद्वारे आयपीएलचे सामने पाहिले, असे आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हा आकडा २० टक्क्यांनी वाढला आहे. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सलामीच्या लढतीलासुद्धा चाहत्यांचा विक्रमी प्रतिसाद लाभला होता. सध्या स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमा मिळून १४ वाहिन्यांवर १० भाषांमध्ये आयपीएलचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in