IPL 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार; भविष्याच्या दृष्टीने संघाची मोठी रणनिती

आम्ही एका रणनितीनुसार हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतल्याचं संघाचा ग्लोबल मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने सांगितलं.
IPL 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार; भविष्याच्या दृष्टीने संघाची मोठी रणनिती

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने, संघात महत्वपूर्ण बदल केला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच संघाकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या इतिहासातील नावाजलेल्या कर्णधारांपैकी एक असलेल्या आणि आपल्या नेतृत्वात संघाला पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद भूषवून दिलेल्या २९ वर्षीय रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करणार आहे. मुंबईने गुजरात टायटन्स संघाकडून हार्दिक पांड्याला १५ कोटींमध्ये खरेदी केलं होतं.

मुंबई इंडियन्स संघाचा ग्लोबल मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने घोषणा करताना मुंबई इंडियन्सने एका रणनितीनुसार हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याचं म्हटलं. यावेळी मुंबई इंडियन्स संघाला भविष्यासाठी तयार करायचं आहे, असं जयवर्धने म्हणाला. त्याने पुढे सांगितलं की, मुंबई इंडियन्सचं सुदैव आहे की त्या संघाला कायम दमदार नेतृत्व मिळालं आहे. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग ते रिकी पाँटिंग अन रोहित शर्मापर्यंत सर्वांनी मुंबई इंडियन्सच्या यशात आपलं योगदान दिलं. आम्ही कायम भविष्यातील संघ तयार करण्याच्या दृष्टीकोणातून कार्यरत असतो. त्यामुळे हाच दृष्टीकोन ठेवून आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेलं.

यावेळी जयवर्धने याने मावळता कर्णधार रोहित शर्माच्या दमदार नेतृत्वाबद्दल त्याचे आभार मानले.रोहितच्या नेतृत्वामुळे संघाने फक्त यश मिळवलं नाही तर तो IPLमधील एक सर्वोत्तम कर्णधार ठरला, असंही तो म्हणाला. रोहित आता जरी कर्णधार नसला, तरी मुंबई इंडियन्स संघाच्या भविष्यातील यशासाठी त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा करतो, असं देखील जयवर्धने म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in