
मुल्लनपूर : महेंद्रसिंह धोनीला डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करून अधिकाधिक धावा जमवाव्या लागतील. त्याच्यासह अन्य खेळाडूंनाही मैदानात जीव ओतावा लागेल. चेन्नई सुपर किंग्जचा संघ मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्ध भिडणार आहे.
चेन्नईने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात निराशाजनक सुरुवात केली आहे. सलग तीन सामने पराभूत होण्याची नामुष्की या संघावर ओढावली आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जला गत सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा चेहरा पाहावा लागला. मात्र तरीही समन्वयाच्या अडचणीचा सामना करणाऱ्या चेन्नईसमोर श्रेयस अय्यरचा संघ तगडा वाटत आहे.
धोनीची संघातील उपस्थिती फायदेशीर मानली जाते. मात्र सध्या त्याचा फॉर्म संघासाठी काहीसा अडचणीचा ठरत आहे. तो यंदा १८व्या हंगामात खेळत आहे. तो अजूनही प्रेक्षकांचा आवडता खेळाडू आहे. धोनी जेव्हा मैदानात फलंदाजीला येतो तेव्हा चाहते जोरदार घोषणाबाजी देत असतात.
चेन्नई विरुद्ध १८० पेक्षा अधिक धावा करण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाचा असतो. जर का शिवम दुबेची बॅट शांत ठेवण्यात प्रतिस्पर्धी संघाला यश आल्यास चेन्नईसाठी विजय मिळवणे कठीण होते. दुबे हा विस्फोटक फलंदाज आहे. मात्र त्याच्या यशाचे प्रमाण ५०-५० टक्के असते.
धोनी - चहल लढत : युजवेंद्र चहल हा फिरकी गोलंदाज चेन्नईविरुद्ध महत्त्वाची कामगिरी करतो. चहल आणि धोनी हे दोन खेळाडू १० वेळा आमनेसामने आले आहेत. चहलने ५ वेळा धोनीला बाद केले आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि युवा खेळाडू नेहल वधेरा यांचा फॉर्म पंजाबसाठी चांगले संकेत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, गुर्जापनीत सिंग, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप