

मुंबई : जीवनात मी कधीही विचार केला नव्हता की मी या सर्व खेळाडूंसोबत खेळेन, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने आपल्या भावना व्यक्त केल्या. रविवारी चेन्नईविरुद्ध सलामीची लढत मुंबईने गमावली. या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये पुथूर बोलत होता.
२४ वर्षीय फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करताना तीन विकेट्स घेण्याची कामगिरी केली. केरळच्या मलप्पुरममधील या गोलंदाजाने आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची घरची परिस्थिती हलाखीची. हा खेळाडू यंदा आयपीएलमध्ये खेळत आहे.
शनिवारी रात्री विघ्नेशने मला कॉल करून सांगितले की, रविवारी त्याला खेळण्याची संधी मिळणार आहे. आम्ही या सामन्याचा प्रत्येक बॉल पाहत होतो, असे पुथूरची आई बिंदू म्हणाल्या.
आम्ही खूप खुश आहोत
आम्ही कधीही विचार केला नव्हता की विघ्नेश पहिल्याच मॅचमध्ये खेळेल. आम्ही खूप खुश आहोत. आम्ही विचार देखील केला नव्हता की त्याला आयपीएलचा करार मिळेल. आता खूप लोक आम्हाला अभिनंदन करण्यासाठी कॉल करत आहेत, असे पुथूरचे वडील सुनील कुमार म्हणाले.