कोलकाताला विजय अनिवार्य? राजस्थान रॉयल्सशी आज सामना

कोलकाता : दमदार पुनरागमन करून आत्मविश्वास उंचावलेल्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या हंगामातील आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सला पराभवाचा चेहरा दाखवावा लागेल. रविवारी हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
कोलकाताला विजय अनिवार्य? राजस्थान रॉयल्सशी आज सामना
छायाचित्र सौ. - IPL Website
Published on

कोलकाता : दमदार पुनरागमन करून आत्मविश्वास उंचावलेल्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या हंगामातील आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सला पराभवाचा चेहरा दाखवावा लागेल. रविवारी हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

उर्वरित चारही सामन्यांत बाजी मारून कोलकाताचा संघ आपल्या खात्यात १७ गुण मिळवू शकतो. या चार सामन्यांतील विजयामुळे त्यांच्या संघाला टॉप -४ मध्ये स्थान पक्के करण्याची संधी आहे.

कोलकाताचे ४ पैकी २ सामने घरच्या मैदानात होणार आहेत. रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आणि बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामने होणार आहेत. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादशी १० मे रोजी आणि फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूशी १७ मे रोजी कोलकाताचा सामना होणार आहे.

कोलकाताचा विस्फोटक फलंदाज व्यंकटेश अय्यरने गेल्या १० सामन्यांत केवळ १४२ धावा केल्या आहेत. शेवटच्या ३ लढतीत त्याला २८ धावाच जमवता आल्या आहेत. गत हंगामात शानदार कामगिरी केलेल्या रिंकू सिंहलाही अद्याप प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्याने ८ सामन्यांत केवळ १८९ धावांची भर घातली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून

logo
marathi.freepressjournal.in