IPL 2025 : बटलरला संघातून सोडणे हा कठीण निर्णय; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे वक्तव्य

जोस बटलर हा आपल्या संघाचा भाग नाही हे मी विसरू शकलो नाही, असे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला.
IPL 2025 : बटलरला संघातून सोडणे हा कठीण निर्णय; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे वक्तव्य
एक्स @CricCrazyJohns
Published on

नवी दिल्ली : जोस बटलर हा आपल्या संघाचा भाग नाही हे मी विसरू शकलो नाही, असे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला. माझ्याकडे याबाबत अधिकार असते तर आयपीएलमधील खेळाडू रिलीज करण्याचा निर्णय काढून टाकला असता असे सॅमसन म्हणाला.

रॉयल्ससाठी सॅमसन आणि बटलर या जोडीने सात वर्षे सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. गेल्या वर्षी मेगा ऑक्शनपूर्वी या इंग्लिश खेळाडूला न राखण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आगामी हंगामात बटलर गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसेल.

एका संघाचे नेतृत्व करण्याचे आणि वरच्या लेवलला खेळण्याची संधी आयपीएलमुळे मिळते. येथे मैत्रीचे नाते तयार होते. जोस बटलर हा जवळचा मित्र आहे. आम्ही सात वर्षे एकत्र क्रिकेट खेळलो. या कालावधीत आम्ही बऱ्याचदा भागीदारी केली. तसेच आम्ही एकमेकांना जवळून ओळखतो. तो मला मोठ्या भावासारखा आहे, असे सॅमसन म्हणाला.

मला जेव्हा काही मदत लागते, तेव्हा मी त्याच्याशी बोलायचो. जेव्हा मी २०२१ मध्ये कर्णधार झालो, तेव्हा तो संघाचा उपकर्णधार होता आणि त्याने मला सहकार्य केले, असे सॅमसन म्हणाला.

आयपीएलच्या आगामी हंगाम २२ मार्चपासून रंगणार आहे. ही स्पर्धा २५ मे पर्यंत खेळली जाणार आहे. त्यामुळे आता संघही जोरदार तयारीला लागले आहेत. राजस्थानचा माजी दिग्गज फलंदाज जोस बटलर यंदा त्या संघात नसेल. बटलरला संघातून रिलीज केल्याची खंत संजूने बोलून दाखवली.

खेळाडूंना सोडण्याचा नियम बदलावा

बटलरला संघातून सोडणे हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होते. त्याला सोडणे हा माझ्यासाठी खूप आव्हानात्मक निर्णय होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान, मी लंचदरम्यान त्याला सांगितले की मी अजूनही यावरून सावरू शकलेलो नाही. जर आयपीएलमध्ये काही बदल करू शकलो असतो, तर मी प्रत्येक तीन वर्षांनी खेळाडूंना सोडण्याचा नियम बदलला असता," असे सॅमसन म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in