IPL 2025 - DC vs LSG : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आज दिल्लीच्या राहुलकडे लक्ष

मुंबईकर श्रेयस अय्यरला अखेर वर्षभरातील मेहनतीचे फळ मिळाले आहे. प्रतिभावान फलंदाज श्रेयसचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीत पुनरागमन झाले आहे.
IPL 2025 - DC vs LSG : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आज दिल्लीच्या राहुलकडे लक्ष
Published on

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. या लढतीत प्रामुख्याने दिल्लीकडून खेळणाऱ्या के. एल. राहुलच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. राहुल गतवर्षापर्यंत लखनऊ संघाकडून खेळत होता. त्यामुळे तो आता आपल्या पूर्वीच्या संघावर कसा खेळ करणार, हे पाहणे रंजक ठरेल. इकाना स्टेडियमवर ही लढत होईल.

अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. तसेच उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील लढतीमध्ये दिल्लीने लखनऊवर मात केली होती. त्यामुळे यावेळी लखनऊ त्या पराभवाचा वचपा घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल. दिल्लीच्या संघात फॅफ डूप्लेसिस, मिचेल स्टार्क, ट्रिस्टन स्टब्स असे विदेशी खेळाडू आहेत. तसेच राहुलच्या साथीला अभिषेक पोरेल, करुण नायर, अक्षर असे भारतीय फलंदाज आहेत. गोलंदाजीत त्यांची विपराज निगम व कुलदीप यादव या फिरकीपटूंवर भिस्त आहे.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनऊने ८ पैकी पाच सामने जिंकले आहेत. गेल्या लढतीत लखनऊने राजस्थानवर सरशी साधली. त्यामुळे हा संघ बाद फेरी गाठण्यासाठी आतुर आहे. पंत, निकोलस पूरन, मिचेल मार्श व शार्दूल ठाकूर या खेळाडूंवर लखनऊची मदार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम, माधव तिवारी.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in