IPL 2026 : केकेआर, लखनौसाठी अस्तित्वाची लढाई; स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजयाची नितांत गरज

आयपीएलच्या चालू हंगामात ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे या दोन कर्णधारांसमोर आता आपले आणि संघाचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रविवारी 'कोलकाता नाईट रायडर्स' (केकेआर) आणि 'लखनौ सुपर जायंट्स' (एलएसजी) हे दोन संघ आमनेसामने येणार असून, दोन्ही संघांची कामगिरी खालावल्याने कर्णधारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
केकेआर, लखनौसाठी अस्तित्वाची लढाई; स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजयाची नितांत गरज
केकेआर, लखनौसाठी अस्तित्वाची लढाई; स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजयाची नितांत गरजX
Published on

लखनऊ: आयपीएलच्या चालू हंगामात ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे या दोन कर्णधारांसमोर आता आपले आणि संघाचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रविवारी 'कोलकाता नाईट रायडर्स' (केकेआर) आणि 'लखनौ सुपर जायंट्स' (एलएसजी) हे दोन संघ आमनेसामने येणार असून, दोन्ही संघांची कामगिरी खालावल्याने कर्णधारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कोलकाताने खराब कामगिरीनंतरही रहाणेवर विश्वास कायम ठेवला असून त्यांना सात सामन्यांनंतर पहिला विजय मिळवण्यासाठी रिंकू सिंगच्या वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून राहावे लागले. अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सविरुद्ध ६७ आणि लखनौविरुद्ध ४१ धार्वाच्या खेळीतून आक्रमक पवित्रा दाखवला असला, तरी या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला आहे. ३८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या रहाणेचे टी-२० मधील नेतृत्व संघाच्या गरजांशी जुळत नसल्याचे दिसून येत आहे.

वरुण चक्रवर्तीची शांत, संयमी सुरुवात आणि वेगवान गोलंदाजांची कमतरता यामुळे रहाणेच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर आणि रहाणे यांनी खेळाडूंची निवड आणि संसाधनांचा वापर यात चुका केल्याचे समोर आले आहे. रचिन रवींद्र अजूनही राखीव खेळाडूंमध्ये आहे, तर फिन अँलन आणि टिम सेइफर्ट यांच्या समावेशाबाबत स्पष्टता नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेले निर्णयही 'केकेआर'च्या अंगाशी आले आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध रहाणे शून्यावर बाद झाल्याने संघाच्या अडचणीत भर पडली. 'केकेआर'च्या खात्यात केवळ ३ गुण असून, पुढील ७ पैकी ६ सामने जिंकण्याचे कठीण आव्हान त्यांच्यासमोर आहे.

दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सची अवस्थाही बिकट असून संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ संघाला ८ पैकी केवळ २ सामने जिंकता आले असून सलग चार पराभवांमुळे त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ६७ धावा केल्यानंतर पंतला गेल्या ५ डावांत केवळ ७२ धावा

करता आल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध अवघ्या ३ चेंडूंत शून्यावर बाद झालेल्या पंतच्या बेजबाबदार फटकेबाजीमुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला.

लखनौचे होम ग्राऊंड असलेले इकाना स्टेडियमही त्यांच्यासाठी सुरक्षित ठरलेले नाही. येथे गेल्या वर्षी ८ पैकी ६ सामने त्यांनी गमावले होते, तर या वर्षी सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. निकोलस पूरन (७३ धावा) आणि एडन मार्करम (१६२ धावा) यांसारखे परदेशी खेळाडूही अपयशी ठरले आहेत.

या सामन्यात 'केकेआर' साठी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना याचे पुनरागमन जमेची बाजू ठरू शकते. १८ कोटी रुपयांना संघात सामील झालेला पाथिराना टिम सेइफर्टची जागा घेण्याची शक्यता आहे. पाथिरानाचा सामना मिचेल मार्श आणि ऋषभ पंत यांच्याशी रंगण्याची चिन्हे आहेत. आकडेवारीनुसार, रहाणेने 'केकेआर' साठी २० पैकी ६ सामने जिंकले असून १२ गमावले आहेत, तर पंतच्या नेतृत्वाखाली लखनौने २१ पैकी ८ सामने जिंकले असून १३ गमावले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिकू सिंग, फिन अॅलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.

लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून.

logo
marathi.freepressjournal.in