२०२८च्या आयपीएलमध्ये ७४ ऐवजी ९४ सामने?

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी २०२८च्या आयपीएलमध्ये ७४ ऐवजी ९४ सामने खेळवण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
२०२८च्या आयपीएलमध्ये ७४ ऐवजी ९४ सामने?
Published on

मुंबई : मुंबई : आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी २०२८च्या आयपीएलमध्ये ७४ ऐवजी ९४ सामने खेळवण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

२००८पासून आयपीएलला प्रारंभ झाला. यंदा आयपीएलमध्ये ७४ सामन्यांचा समावेश आहे. मात्र २०२८मध्ये हा आकडा ९४ पर्यंत वाढू शकतो. तसेच १० संघांचा आकडा मात्र तितकाच राहील, असेही धुमाळ म्हणाले. यंदा २५ मे रोजी आयपीएलचा १८वा हंगाम संपेल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे धुमाळ म्हणाले. २०२८मध्ये ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे.

दरम्यान, मुंबई-लखनऊ यांच्यातील लढतीत षटकांची गती संथ राखल्यामुळे लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अन्य खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून ६ लाख रुपये कापण्यात आले. लखनऊने निर्धारीत वेळेत २ षटके कमी टाकली. पंतवर अशी दुसऱ्यांदा वेळ ओढवली. तिसऱ्या वेळेस दंडाची रक्कम दुप्पट होईल. मात्र त्याला सामन्याला मुकावे लागणार नाही. पंतच्या फलंदाजीवरही गेल्या काही सामन्यांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in