विजयी मालिका कायम राखण्याचा मुंबईचा प्रयत्न; चेन्नईविरुद्ध आजच्या सामन्यात धोरण बदलण्याची संधी

IPL 2025, MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खराब फॉर्मचा सामना करत आहे. हा संघ रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ आपली विजयी मालिका कायम राखण्याच्या प्रयत्नात असून आपल्या धोरणात बदल करण्याची संधी या संघाकडे आहे.
विजयी मालिका कायम राखण्याचा मुंबईचा प्रयत्न; चेन्नईविरुद्ध आजच्या सामन्यात धोरण बदलण्याची संधी
IPL/X
Published on

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खराब फॉर्मचा सामना करत आहे. हा संघ रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ आपली विजयी मालिका कायम राखण्याच्या प्रयत्नात असून आपल्या धोरणात बदल करण्याची संधी या संघाकडे आहे.

मुंबईच्या संघाने हंगामाची सुरुवात निराशाजनक केली. मात्र त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. अन्य काही संघही याच परिस्थितीत आहेत.

वानखेडेच्या या खेळपट्टीवर मुंबईच्या संघाने नियोजनबद्ध कामगिरी करत हैदराबादच्या फलंदाजांना आपल्या नियंत्रणात ठेवले. ही खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल आहे. शिवाय वेगवान गोलंदाजही तेथे फायदेशीर ठरत आहेत. त्याचाच उपयोग मुंबईला हैदराबादविरुद्धच्या सामन्यात झाला. या खेळपट्टीवर चेन्नईविरुद्ध फिरकीची रणनिती मुंबईसाठी धोकादायक ठरू शकते. कारण चेन्नईच्या नूर अहमदने सात सामन्यांत १२ विकेट घेतल्या आहेत.

बुमरा, रोहित, जडेजाला खुणावतायेत रेकॉर्ड

- स्टार गोलंदाज जसप्रीत क्रिकेटमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये ३०० विकेट पूर्ण करण्यासाठी बुमराला ३ विकेटची आवश्यकता आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी बुमराला ४ विकेटची गरज आहे

- टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने धडाकेबाज कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला केवळ ८८ धावांची आवश्यकता आहे.

- चेन्नईकडून खेळताना २००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी रवींद्र जडेजाला ११ धावांची गरज आहे. तसेच आयपीएलमध्ये चेन्नईतर्फे सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवण्यासाठी त्याला ४ विकेटची गरज आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिषा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस.

मुंबई इंडियन्स

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

logo
marathi.freepressjournal.in