आयर्लंडचा पहिला कसोटी विजय; आठव्या कसोटीत उघडले विजयाचे खाते

आयर्लंडपुढे विजयासाठी १११ धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची एकवेळ ४ बाद ३९ अशी स्थिती होती.
आयर्लंडचा पहिला कसोटी विजय; आठव्या कसोटीत उघडले विजयाचे खाते
Published on

ओव्हल : मार्क अडेरने (५६ धावांत ३ बळी) दुसऱ्या डावातही केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर आयर्लंडने एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा ६ गडी राखून धूळ चारली. याबरोबरच आयर्लंडने कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय नोंदवला. आयर्लंडने आठव्या कसोटी सामन्यात विजयाचे खाते उघडले, हे विशेष.

अफगाणिस्तानचा दुसरा डाव २१८ धावांत गुंडाळल्यावर आयर्लंडपुढे विजयासाठी १११ धावांचे लक्ष्य होते. कर्णधार हश्मतुल्ला शाहिदीने ५५ धावांची झुंज दिली. तसेच रहमनुल्ला गुरबाझने ४६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची एकवेळ ४ बाद ३९ अशी स्थिती होती. कर्णधार अँडी बल्बिर्नी (९६ चेंडूंत नाबाद ५८) आणि लोर्कान टकर (नाबाद २७) यांनी पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचून आयर्लंडचा विजय साकारला. पहिल्या डावात ५ व दुसऱ्या डावात ३ बळी टिपणाऱ्या अडेरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in