

मुंबई : भारताचा डावखुरा मायदेशात फलंदाज इशान किशनची आगामी मिळवणारा पहिलाच संघ आयपीएलसाठी सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही लढतींना मुकणार आहे. त्यामुळे तो तंदुरुस्त होऊन येईपर्यंत किशन हैदराबादचे नेतृत्व करेल.
काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद फलंदाज इशान किशनची आगामी मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आयपीएलसाठी सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही लढतींना मुकणार आहे. त्यामुळे तो तंदुरुस्त होऊन येईपर्यंत किशन हैदराबादचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर भारताने आयसीसी जेतेपदाची हॅटट्रिक साध्य केली. भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता.
आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. विराट कोहलीचा समावेश असलेला आणि रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. याच लढतीद्वारे किशन नव्या पर्वाला प्रारंभ करेल.
"पाठीच्या दुखापतीमुळे कमिन्स काही लढतींना मुकण्याची शक्यता आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत इशान किशन हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. तसेच अभिषेक शर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दोघांनाही शुभेच्छा," असे द्वीट बुधवारी हैदराबाद संघाने केले.
कमिन्स दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूरच आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकच लढत खेळता आली. तसेच टी-२० विश्वचषकालाही तो मुकला. कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ साखळीतच गारद झाला. तसेच गतवर्षी हैदराबादला आयपीएलमध्ये साखळीत गाशा गुंडाळावा लागला होता. आता किशनच्या नेतृत्वात हा संघ सुरुवातीच्या लढतींमध्ये छाप पाडण्यास आतुर असेल. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने बीसीसीआय पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करणार आहे.