Video: डी वाय पाटील स्टेडीयममध्ये ईशान किशनची धडाकेबाज फलंदाजी; पुनरागमन केल्यानंतर चौकार, षटकार मारले पण...

मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेला भारताचा स्टार विकेटकीपर ईशान किशन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे.
Ishan Kishan
Ishan Kishan

मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेला भारताचा स्टार विकेटकीपर ईशान किशन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडीयममध्ये ईशाननं क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्याचं समोर आलंय. रुट मोबाईल आणि आरबीआय या संघांमध्ये रंगलेल्या सामन्यात इशानने चौकार, षटकार ठोकून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. चौका- षटकाराची फटकेबाजी सुरु असतानाच प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज मॅक्सेवेल स्वामिनाथने भेदक मारा केला आणि ईशानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ईशान १९ धावांवर असताना मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. परंतु, मैदानावर ईशानने केलेल्या फटकेबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना ईशान विश्रांतीसाठी भारतात परतला होता. परंतु, त्यानंतर रणजी ट्रॉफी सामने न खेळल्यामुळे आणि फिटनेसच्या कारणांमुळे इशान वादात सापडला होता. पण त्याने आता डी वाय पाटील स्टेडीयममध्ये झालेल्या सामन्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. दोन चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. आरबीआई संघाकडून ईशान किशन खेळत आहे. दरम्यान, प्रतिस्पर्धी संघाने आरबीआईला सामना जिंकण्यासाठी १९३ धावांचं आव्हान दिलं होतं.

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ईशान किशनच्या क्रिकेट खेळण्याबाबत भाष्य केलं होतं. ईशानला जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचं असेल, तर त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने खेळावे लागतील, असं द्रविडनं म्हटलं होतं. त्याचदरम्यान रणजी ट्रॉफीचे सामने सुरु होते. त्यावेळी झारखंड संघही या टूर्नामेंटमध्ये सहभागी झाला होता. परंतु, ईशानने रणजी ट्रॉफी सामने खेळण्याऐवजी आयपीएलसाठी फिटनेस ट्रेनिंग सुरु केल्याचं समोर आलं. ईशानने तो रेड बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तयार नाही, फिटनेसवर लक्ष द्यायचं आहे, असं म्हणत बीसीसीआयला प्रत्युत्तर दिलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in