... आणि ईशान किशनची वर्णी लागली

बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली, 7 ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार
... आणि ईशान किशनची वर्णी लागली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी, दुखापतींनी भारतीय संघाला सतावले आहे. कर्णधार रोहित शर्माची संघ निवड करताना चांगलीच दमछाक होणार आहे. ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांनी दुखापतींमुळे आधीच माघार घेतली आहे. तथापि, बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली, 7 ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. परंतु, केएल राहुलला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने मोठी समस्या निर्माण झाली. लोकेश राहुलच्या जागी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती आणि आज बीसीसीआयने आज त्याची घोषणा केली.
लोकेश राहुलला आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली आणि त्याला आयपीएल तसेच डब्ल्यूटीसी फायनलमधून माघार घ्यावी लागली.

लोकेशच्या जागी इशान किशनला संघात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केएस भरत हा संघातील एकमेव यष्टिरक्षक-फलंदाज असून त्याचा बॅकअप म्हणून इशानची निवड करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in