
मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश रणजी सामन्यामध्ये युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने एक वेगळा विक्रम आपल्या नावावर करून सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडले. जयस्वालने यूपी विरुद्ध उपांत्य फेरीच्या दोन्ही डावांत शतक झळकावले.
रणजी ट्रॉफी सामन्याच्या दोन डावात शतक झळकावणारा जयस्वाल आता मुंबईचा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि वसीम जाफर या मान्यवरांच्या यादीत तो सामील झाला आहे. रणजी करंडक उपांत्य फेरीच्या तिसऱ्या दिवशी मुंबईने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले आणि पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मुंबईसाठी दुसऱ्या डावात अरमान जाफर ने देखील शानदार शतक केले. जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.