मुंबईकर यशस्वी भारतीय संघात ; जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी जैस्वालची निवड
मुंबईचा प्रतिभावान डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालची आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघातील राखीव खेळाडूत निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी लंडनला जाणार असल्याचे समजते.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून ओव्हल येथे डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना रंगणार असून, या लढतीसाठी भारताने आधीच १५ खेळाडूंचा चमू जाहीर केला आहे. ऋतुराजची पर्यायी सलामीवीर म्हणून राखीव खेळाडूंत निवड करण्यात आली होती. मात्र, ऋतुराज ३-४ जून दरम्यान विवाहसोहळ्यात व्यस्त असेल. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सांगण्यावरून बीसीसीआयने २१ वर्षीय यशस्वीला संधी देण्याचा विचार केला असून, तो पुढील काही दिवसांत लंडनला रवाना होणार आहे. यशस्वीने यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १४ सामन्यांत एक शतक व पाच अर्धशतकांसह ६२५ धावा केल्या. त्याशिवाय आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकही झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यशस्वीने १५ सामन्यांत १८४५ धावा केल्या असून, यामध्ये नऊ शतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वालची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून यशस्वी जैस्वालची निवड करण्यात आली. ऋतुराजचे ३ जून रोजी लग्न असल्यामुळे आता यशस्वीला संघात संधी मिळाली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऋतुराजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाडला स्टँडबाय सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये समाविष्ट केले होते. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, यशस्वीकडे यूकेचा व्हिसा असल्याने तो संघात सामील होऊ शकेल. येत्या काही दिवसांत तो लंडनला जाणार असल्याचे सांगण्यात येते. सलामीचा फलंदाज दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे खेळू शकला नाही तर यशस्वीला खेळण्याची संधी मिळू शकते.
संघ व्यवस्थापनाने यशस्वीला लाल चेंडूने सराव करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये १४ डावात ६२५ धावा केल्या. प्रथम श्रेणी स्पर्धेतील ५ सामन्यात ४०४ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ८० इतकी आहे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल या २१ वर्षीय युवा फलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये केवळ शतकच केले नाही तर ६२० हून अधिक धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचा विक्रम अतुलनीय आहे. रणजी ट्रॉफीमध्येही त्याने शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींपासून ते मोहम्मद कैफपर्यंत अनेकजण जैस्वालला टीम इंडियात स्थान मिळण्याबाबत आशावादी होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा बहुप्रतीक्षित अंतिम सामना लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे ७ जूनपासून खेळविण्यात येणार आहे. आयपीएलमधून बाहेर पडलेल्या टीममधील बरेचसे खेळाडू आधीच इंग्लंडला रवाना झाले आहेत.;तर उर्वरित खेळाडू हे लवकरच रवाना होणार आहेत. सूर्यकुमार यादव ३० मे रोजी आयपीएल फायनलनंतर मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि रवींद्र जडेजासह तेथे जाणार आहे.
द्रविडला लवकर हवा होता पर्याय
लग्न असल्याने ऋतुराजने बीसीसीआयला ५ जूननंतरच संघात सामील होऊ शकेल, असे कळविले होते. परंतु प्रशिक्षक राहुल द्रविड यांना पर्यायी खेळाडूची निवड लवकर हवा होता. ऋतुराजने लग्नामुळे वेळेवर संघात सामील होऊ शकणार नसल्याचे सांगितल्यामुळेच यशस्वीचा समावेश करण्यात आल्याचे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रशिक्षक राहुल द्रविडने निवडकर्त्यांना ऋतुराजचा पर्याय विचारल्यानेच यशस्वीची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , के. एस. भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक). स्टँडबाय खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.