१५ जानेवारी आता 'महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन', खाशाबा जाधव यांचा जन्मदिन साजरा करण्याच्या एमओएच्या प्रयत्नांना यश

देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व. खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्म दिवस हा आता 'महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जाणार
१५ जानेवारी आता 'महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन', खाशाबा जाधव यांचा जन्मदिन साजरा 
करण्याच्या एमओएच्या प्रयत्नांना यश

मुंबई : देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व. खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्म दिवस हा आता 'महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे, यासाठी शासनाच्या वतीने खास शासननिर्णय जाहीर करण्यात आला. हा दिन साजरा करून आता देशासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवणाऱ्या खाशाबा यांच्या कार्याचा गाैरव हाेणार आहे. यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने अथक प्रयत्न करण्यात आले. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच शासनानला हा महत्वाचा निर्णय जाहीर करावा लागला. यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने घवघवीत यश मिळाले आहे.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या कराड येथील खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीत पहिले पदक पटकावले हाेेते. हे भारताचे वैयक्तिक गटातील पहिले ऑलिम्पिक पदक ठरले. यामुळे भारतीय संघाच्या नावे पदकाचा बहुमान नाेंदवल्या गेला. खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाला हा माेठा बहुमान मिळाला. यामुळे १५ जानेवारी हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म दिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा हाेणार आहे. यातून निश्चितपणे खाशाबा यांच्या कार्याचा गाैरव केल्यासारखेच आहे. यासाठीचा प्रस्ताव हा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये महाराष्ट्र माॅडर्न पेंन्टाथलाॅन संघटनेचे उपाध्यक्ष अमित गायकवाड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या वतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आला. अध्यक्षांनी या प्रस्तावाचे समर्थन करत शासन दरबारी शिफारस केली. या वर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण साेहळ्यात याची घाेषणा करण्यात आली. मुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक अविनाश सोलवट यांचे या कार्यामध्ये मोलाचे योगदान ठरले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनास ५० हजार तर क्रिडा सप्ताहास १ लाख रुपये असे एकुण २ लाख २५ हजार सुधारीक अनुदान देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमीसांठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in