जसप्रीत बुमराहने वन-डे गोलंदाजांच्या क्रमवारीत पटकाविले अव्वल स्थान

बुमराहने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकून अव्वल स्थान मिळविले.
जसप्रीत बुमराहने वन-डे गोलंदाजांच्या क्रमवारीत 
पटकाविले अव्वल स्थान

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसीच्या टॉप वन-डे गोलंदाजांच्या क्रमवारीत ७१८ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले. यापूर्वी तो चौथ्या स्थानावर होता.

बुमराहने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकून अव्वल स्थान मिळविले. बोल्ट आता दुसऱ्या स्थानावर गेला. लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी केल्याने बुमराह एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज ठरू शकला. बुमराह याआधी एकूण ७३० दिवस एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता. इतर कोणत्याही भारतीय खेळाडूपेक्षा ही लक्षणीय कामगिरी आहे. याआधी बुमराह टी-२० क्रमवारीतही नंबर वन‌् गोलंदाज राहिला आहे. कसोटी क्रमवारीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या कारकिर्दीतील ती सर्वोत्तम क्रमवारी आहे. अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा हे देखील वन-डे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिले होते.

एकदिवसीय क्रमवारीत अव्वल १० गोलंदाजांमध्ये बुमराहव्यतिरिक्त एकही भारतीय नाही. लेगस्पिनर युझवेंद्र चहलचा टॉप-२० मध्ये समावेश झालेला भारतीय गोलंदाज आहे. तो २० व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी २३ व्या, तर भुवनेश्वर कुमार २४व्या स्थानावर आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in