जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा नवा कर्णधार

अश्विन आणि रिषभ पंत संघात असतानादेखील बुमराहला मिळालेल्या या संधीबद्दल प्रश्न उपस्थित
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा नवा कर्णधार
ANI

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी उद्यापासून एजबॅस्टन येथे सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. मात्र भारताचा कर्णधार शर्मा कोरोनामुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशावेळी भारतापुढे कर्णधार कोण ? हा पेच उभा राहिला. बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा नवा कर्णधार असणार आहे. कपिल देव यांच्यानंतर भारताचा कर्णधार असलेला बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज आहे. अश्विन आणि रिषभ पंत संघात असतानादेखील बुमराहला मिळालेल्या या संधीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in