Jasprit Bumrah : भारताचा हुकमी गोलंदाज टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

चांगल्या उपचारांसाठी बुमराह पुढील महिन्यात लंडनला रवाना होण्याची शक्यता
Jasprit Bumrah : भारताचा हुकमी गोलंदाज टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

जलद गोलंदाज व दुखापत हे समीकरण ठरलेलंच असतं. त्यामुळे आपल्या कारकिर्दीमधील बराच काळ कधी कधी गोलंदाजांना मैदानापासून लांब राहावे लागते. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या विश्वचषकाला मुकणार आहे. कमरेला झालेल्या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेतून तो बाहेर पडला आहे. शस्त्रक्रियेची गरज नसली तरी पाठदुखीमुळे पुढील ५ ते ६ महिने त्याला मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.

नुकतेच जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान संघात पुनरागमन केले. पहिल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये संधी देण्यात आली. त्यात तो विशेष प्रभाव पाडू शकला नाही. जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यानंतर तो दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका आणि आशिया कप स्पर्धेदरम्यानही तो संघाबाहेर होता. विश्वचषकापूर्वी त्याची फिटनेस तपासणी महत्त्वाची आहे, त्यासाठी त्याला काही सामने खेळवले गेले. पण त्यामुळे दुखण्यामध्ये भर पडली. चांगल्या उपचारांसाठी बुमराह पुढील महिन्यात लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्याला पुढील ६ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in