एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी; बुमराह पुन्हा आऊट

दुखापतीमुळे ५ महिने बाहेर असलेला भारताचा स्टार गोलंदाज संघात परतणार अशा असतानाच पुन्हा एकदा वाईट बातमी मिळाली
एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी; बुमराह पुन्हा आऊट

५ महिन्यांपूर्वी भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाल्यानंतर तो भारतीय संघात कधी परतणार याची क्रीडाप्रेमी वाट बघत आहेत. अशामध्ये ६ दिवसांपूर्वी त्याचा श्रीलंकेविरुद्ध १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र, आज पुन्हा तो संघामध्ये इतक्यात परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेविरुद्ध जाहीर केलेल्या एकदिवसीय संघातून त्याला वगळण्यात आले आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या आदल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, "जसप्रीत बुमराह हा सामना खेळणार नाही. दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी तो मेहनत घेत आहे. दोन दिवसांपूर्वी पाठीमध्ये थोडा त्रास जाणवू लागला. अशामध्ये विश्वचषकाचा विचार करता त्याला खेळवणे योग्य ठरणार नाही. लवकरच तो आपल्याला मैदानात दिसेल हे मात्र निश्चित आहे." यामुळे आता यावर शिक्कामोर्तब झाले की तो ही एकदिवसीय मालिका खेळणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in